वयोमानाप्रमाणे अक्कल-दुक्कल आणि टक्कल
The flight and images of our passionate desires.
उड्डाण, स्वत:च्या उत्कट इच्छा आणि प्रतिमात्मक सावल्या
उड्डाणात स्वतःच्या विचारांना सम्पूर्ण स्वातंत्र्य आणि मोकळीक आहे।
मानवाचे वय आणि सावली, कशाचेही मोज-माप किंवा प्रमाण नाही।
काळ, काम आणि वेग केवळ तुकडी इयत्तेचे अंकगणित आहे।
काळे केस वयोमानाप्रमाणे शुभ्र पांढरे किंवा चम्पीमय होतात,
हे परिपक्वतेचे प्रमाण नाही; केवळ एक नैसर्गिक घटनात्मक परिणाम आहे।
सूक्ष्म दृष्टिकोनात, नैसर्गिक तत्वे अथवा पंचमहाभूतें
आकाश, वायू, पृथवी, अग्नी आणि जल
कोणीही मांडली नाहीत;
ही निसर्गतः सनातन, अनादी-अनंत उपस्थित आहेत।
ॐ अथवा एकोंकारसतनाम ध्वबी तरंगत, ह्यांची उवस्थिती भासते।
शिकले-सवरलेले लोक, सहसा अहंकारी-पांडित्य दर्शवितात।
कामा विना, ध्येया विना, सगळं शिक्षण वाया जातं रं ,
शिकलेल सगळें, नासाडतात,
आणि त्यावर अशिक्षित पणें वावरतात, हे त्यांचे प्रमाण।
हीच ब्राह्मणांची शूद्रावस्था, अथवा अहंकारी दुरावस्था।
ब्राह्मण म्हणजे सुशिक्षित विचार-आचार पद्धती।
ब्राह्मणाच्या घरी जन्मून, हक्काने ब्राह्मण बनत नाही।
ऐकीवात आहे कि लंकाधीश रावण, जन्मतः आणि जात्या ब्राह्मण,
सर्ववेद-शास्त्र संपन्न आणि श्री शिवशन्कराच्या वरदानास प्राप्त झालेला,
पण अहंकार-वासना बाळगून, स्वतःच्या नाशास प्राप्त झाला।
ब्राह्मण अथवा ब्राह्मणत्व, पांडित्याचे पारितोषिक नव्हे।
जनसेवेचे एक अमूल्य साधन आणि जवाबदारी भासते।
जो अनुभूतिक ब्राह्माण, ब्रह्मवेता आणि तिन्ही लोकीचा दृष्टा,
तो भ्रष्ट होणें असम्भव.
अशिक्षित लोक देखील, साधे-सोज्वळ आणि निर्मळ भावात आत्मज्ञान आणि आत्ममबोधास प्राप्त होतात।
आत्मज्ञान म्हणजे, स्वतःच्या अनुभवावर आधारलेले ज्ञान।
आत्मबोध म्हणजे, केवळ अंतर्यामी ज्ञानाची अनुभूती।
सरते शेवटी, प्रत्येकाची अनुभूती एकच वैश्विक सत्य,
जे कधीही बदलत नाही आणि दुरावत नाही।
सुशिक्षित आणि अशिक्षित ह्यातला सूक्ष्म फरक, अनुभूती आहे।
हे कोणतेही गणित शास्त्र किंवा पांडित्य नाही।
अहंकार आणि आत्म-अनुभूती ह्यांचे संगम असम्भव भासते,
जसे चन्द्र आणि सूर्य मिलन, अंधार आणि उजेड ह्यांचे अस्तित्व।
चंद्राचा उजेड सूर्याचा, पण सूर्याचा उजेड स्वतःचाच।
रामजोशी सिनेमात, बयाने लावणीत सवाल केला,
पोथ्या पोरानं वाचुन-घोकुन, अक्कल वाढली असल अती,
तरी, चंद्राचं चांदनं उष्ण का शीतल,
सांगा-हो-मजला प्रजापती ?
जीवनाची खरी आणि अमूल्य साक्षरता,
अ-ब-क-ड ~ आणि १-२-३-४ ~ आकडे-मोडीत साठलेली नाही।
शांतिनिकेतन परिसारात,
ध्यानस्त एकाग्रता, अथवा अनासक्त जन-जीव सेवा,
हीचि वैश्विक साक्षरतेची एकलव्य शाळा।
देव अथवा दैवीसम्पदा, एक कल्पनात्मक भाव आहे।
देव = सत्य, चित्त आणि आनंद अशी त्रिगुणात्मक कल्पना आहे।
सत्य = जे कधी बदलत नाही, अनादी-अनंत आहे, ते तत्व।
चित्त = आत्मस्वरूप, जे डोळ्याच्या नजरेने दिसत नाही ते।
आनंद = परमानंद स्वरूप जे केवळ उमजते, ते।
नर्क आणि भिती हे स्वतःच्या अज्ञानाचे रूप आणि स्वरूप आहे।
भिती बाळगून, देवाची पुजा आणि सतत भीक-आराधना,
हे स्वतःचे दिव्य अज्ञान प्रदर्शन आहे।
गंगेत डुबक्या मारून, मनो-पापें धुतली जात नाहीत।
गौरीशन्कर शिखर गाठून, केवळ स्वतःच्या अहंकाराचे झंडावंदन होते।
स्वर्ग = स्वतःच्या अहंकाराचे सम्पूर्ण विलीनीकरण, जे पृथ्वीवर योग्य योग साधने द्वारा साधता येते।
देव अथवा दैवीसम्पदा म्हणजे कॅलेंडर वर छापिलेले मोहक चित्र,
किंवा मूर्ती मध्ये आकारलेले भावनात्मक रूप नव्हे।
संत तुकारामने प्रेमाने आणि भक्तिभावाने गाइले ,
“ माझा देह माझ्या देवाचे मंदीर “
ह्या अंतर्यामी डुबकीतच, एकमेव आत्मबोध अथवा अनुभूति भासते।
तसेच, अनासक्त जनसेवेच्या डुबकीत देखील, हीच एकमेव अनुभूति भासते।
भगवन्त सदा भुकेला, अनासक्त भक्तीचा पाहुणा।
देवा, दीनबंधू दीनानाथ,
मी सदा गँगाराम भोलानाथ !
देऊ नको मला, मी जे मागतो ते।
दे मला, जे मला झेपेल तसे ~~
माझ्या सद्बबुद्धीची निरंतर दोरी, सदा तुझ्या हाती।
No comments:
Post a Comment