Friday, March 24, 2017

तीन वेगळ्या प्रवाहात एकच जीवन मूलार्थ






मानवाच्या परिचयाचे तीन प्रमुख प्रवाह आहेत. एक जल प्रवाह,  दुसरा रक्त प्रवाह. आणि तिसरा वायू प्रवाह. प्रत्यक्ष ह्या तीन  प्रवाहांचा प्रवास एकच, पण आत्म-बौद्धिक प्रभाव वेगळा भासतो;  जसे महारथी च्या नजरे खाली तीन घोडे, किंवा निळ्या आकाशाच्या नजरेखाली  तीन वेगवेगळ्या महानद्या।  
जल, रक्त आणि वायू ह्या तीन प्रवाहात, वायूचा प्रवाह आणि त्याचे अस्तित्व नजरेनी दिसत नाही पण आनंदाई भासते, जशी गंगा आणि यमुनेच्या संगमातून, गुप्त सरस्वती स्वरूप प्रसन्नता।   
गुप्त प्रवाह सरस्वती ची प्रसन्नता दर्शविण्यास चित्रकार आपल्यापरी प्रयत्न करित असतात, त्याचे एक प्रचलित दृश्य खाली दिले आहे।  




प्रत्यक्षात जल, रक्त आणि वायू ह्या प्रत्यक प्रवाहाचा प्रभाव जीवनास अमृततुल्य आहे, ह्याचा मूलार्थ समजणे आणि उमजणे प्रत्यक मानवास जन्मभूमी आणि अखंड आकाशाच्या प्रभावाचा परिचय करून देतो।  हा अंतर्यामी अथवा अक्षरा प्रवास आहे; तो मुळाक्षरे, शिष्यवृत्ती किंवा अंकगणित बद्दल नाही।  त्यातून साक्षात्कार एक अवर्णनीय अनुभूती आहे . The Literacy of Life is not about Alphabets, Arithmetic and intellectualised  Philosophy of Life. Revelation is purely an inner experiential, indescribable and individual specific experience .


Mr. Raghavendra Garde ( @ Pune, Maharashtra, India ) expressed his opinion,  “  I opine that though it is an individual experience in that it can be realized by an individual in and through meditation, what is experienced is universal and not individual specific. One experiences pure existence which is also bliss as also knowledge (PRADNYA). In technical terms the "Triputi" of the knower, the known and the process of knowing is resolved.
What sayest thou?


As opined by Raghavendra, What is ultimately experienced is indeed Universal irrespective of individual specific routes. Bliss is that indescribable inner Universal experience that condenses like a pure Dewdrop with absolutely no contradictions.


जल प्रवाह -
सर्व जीवांच्या जन्म भूमीवर, जलप्रवाहाची विभिन्न आणि असंख्य पात्रें आढळतात . त्या सर्व जल पात्रांची गोळा बेरीज होऊन, शेवटी एकच महानदी आणि तिला विलीन होण्यास एकच तत्वरूप महासमुद्र…ज्याची आध्यत्मिक ओळख असावी हिंद महासागर, निर्वाण, एकोंकार, अक्षरा, अथवा ॐ।  


रक्त प्रवाह -
रक्त प्रवाहाची जीवाच्या शारीरिक रक्त वाहिन्यात स्थापना कशी आणि कधी होते ह्याला जीवन धारा प्रतिष्ठाण म्हणून सम्बोधिता येईल. वैश्विक ऊर्जा शक्ती, ज्याच्या सहाय्याने आपल्या व्ह्रदयाच्या ठोक्यांनां आपोआप अथवा स्वयंचलित स्फूर्ती मिळते हेच गुह्य उमजणे, आध्यात्मिक शास्त्र भासते।  


वायू प्रवाह -
वायू अथवा हवा, एक अदृश्य द्रवपदार्थ आहे।  


प्राणवायू आणि अप्राणवायु प्रत्येक मानवाच्या स्वाभाविक परिचयाचा असतो; पण जीवनाच्या अनंत धावपळीत त्याकडे सहज दुर्लक्ष असते। योगशास्त्रात प्राणायाम द्वारे त्याचा परिचय करण्याचा प्रयास असतो।  प्राण विना माकड चेश्टा नव्हे, नर-नारी नृत्य आणि संगीत नव्हे, आणि जीवनात जे पाहिजे ते नव्हे केवळ स्वतःच्या धडपडी मुळे। प्राणाची महिमा अगाध भासते !


लहान पणी वयाच्या अंदाजे दहाव्या वर्षी, मी आणि माझा लहान भाऊ सुरेंद्र, एकदिवस आम्ही दोघे आमच्याहू लहाना रमेश पंडित शी शुल्लक कारणानी भांडलो. रमेश आमचा निकटचा शेजारी।  रमेश च्या आईने आमच्या आजोबांकडे त्या भांडणाबद्दल तक्रार केली होती। त्यानंतर संध्याकाळी आम्हा दोघांना बरोबर घेऊन आजोबांनी पाळण्यावर बसवून प्रेमाने शिकविले होते, ते ज्ञान स्वरूप आज देखील ८०+ वर्षा नंतर आठवते आह।  


“ अति परिचयात अवद्न्या, सन्तत गमनात अनादरॊ भवती |
अथवा, मलये भिल्ल पुरन्दरि, चन्दनतरु काश्ठिकामिव | … “


ह्याचा मूलार्थ आजोबांनी प्रेमाने समजाऊन सांगितला होता।  
“ निलगिरी पर्वताच्या जंगलात राहणारी भिल्लीण, स्वाभाविक रीत्या चंदनाचे लाकूड स्वयंपाकास वापरते ! “  
तो अर्थ आमच्या बिनडोक तारुण्यात देखील सहज उमजला कारण आम्ही सगळे नुकतेच उन्हाळ्याच्या सुट्टीत सुंदर घनदाट जंगल व्यापक निलगिरी पर्वताच्या टोकाशी उटकमंड गावी २ महिने राहून आलो होतो।  
प्रस्तुत केलेल्या आजच्या प्रातः काळच्या विचारांचे अनिवार्य तात्पर्य भासते आहे :
“ प्रत्यक्ष आणि प्रत्येक जीवन प्रवाहाचे (जल, रक्त आणि वायू ) तत्व स्वरूप उमजणे ह्याचेच नाव आत्मज्ञान असावे ज्याच्या द्वारे आपण आत्मबोधास प्राप्त होण्याचा संभव भासतो।   “


श्री शास्त्री ( Oakville, Ontario, Canada ) ह्यांनी संकेत केला :
जल, रक्त अन वायू प्रवाहांचा त्रिवेणी संगम हाच जीवनार्थ,
                                हे जीवन रहस्य ,  
                                हा जीवन संकेत ,
                                 हेच जीवन मर्म  .








आत्मज्ञान आणि आत्मबोध हे स्वतःच्या अनुभविक पायांवर उभारलेले आणि आधारलेले ज्ञान; जे पांडित्य प्रदर्शन नव्हे !


भटकणाऱ्या जनतेस, भूलोकीच्या पर्यटनास असंख्य प्रवासी संस्था आणि साधने सहज  उपलब्ध आहेत।   


No comments:

Post a Comment

Flying Elephant and Dancing Donkey

Flying Elephant and Dancing Donkey When you see them both performing their arts  in the same arena, it is time to shut up and watch....