Tuesday, May 23, 2017

The Timeless Ramayana - कालातीत रामायण


स्वतःचे रामायण आपण स्वतःच रचतो, ज्याची मर्यादा केवळ एक मानव जन्म यात्रा.  

सर्व साधारणपणें श्री तुलसीदासनी लिहिलेले तुलसी-रामायण अथवा राम चरित मानस  प्रचलित आहे. अयोध्याचा राजा दशरथ, त्याच्या चार राण्या आणि त्याचे चार पुत्र - राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. सर्व भावंडासह रामचे १२ वर्षाचे गुरुकुल शिक्षण, वडलांच्या आदेशानुसार १२ वर्षाचा खडतर वनवास, रावणाच्या हाती सीता हरण, लंका दहन, लन्केश्वर रावणाचा वध, मारुती रायाची व्ह्रदयात्मक राम-सीता  सेवा, आणि शेवटी पुष्पक विमानाने  अयोध्येस परतून, रामाचे सिम्व्हासनावर आरूढ होऊन रामराज्य. हा  संत तुलसीदासाने सोळाव्या शतकात रचलेला “ राम चारित मानस “ ग्रन्थ आहे, एक रम्य कथा आहे. बालपणातून हा ग्रन्थ ग्रहण करून, भक्ती भावास प्रज्वलित करतो. भक्तिभावात एक विशेष रस आहे, जो मानवाच्या आध्यात्मिक जीवनास उत्तेजित करतो . दृढविश्वासात एक विशिष्ट प्रकारचे बळ आहे जे रामाबरोबर स्वतःला अनंत सागरा पलीकडे सुरळीत पोहोचवते …जैसे केवढ ने दोनों हाथ जोडकर प्रभु रामसे कहा “ प्रभु, आज आप तीनों मेरे नौआ में बिना मूल्य बैठें, मैं आपको नदी पार जरूर ले चलूँगा; परन्तु प्रभु मेरी एकही बिनंती है “ जब मैं आऊंगा तेरे घाट, पार मुझे कराईयो “

https://www.youtube.com/watch?v=DYkS439LMqk
 ह्याच्या पूर्वीचे रामायण ऋषी वाल्मिकीचे लिखित ( इ.स. पूर्व पाचवे ते पहिल्या शतकाच्या दरम्यान, Valmiki - Wikipedia
https://en.wikipedia.org/wiki/Valmiki
 एक रामायण सीता चरित मानस भासते, आणि दुसर्या रामायणात राम चरित मानस भासते. शेवटी सीता-राम एकच अध्यात्मिक चरित्र, आणि श्री हनुमान सेवापरमोधर्महि चरित्र.
श्री रामचा जन्म ई, स. पूर्व ५००० किंवा ८००० वर्षांपूर्वे झाला हे अध्यात्मिक दृष्टीत महत्वाचे नाही. काळ, काम आणि वेग केवळ मानवी कल्पना आहेत. मुळात रामायण हे जीवनाचे गूढ काव्य आहे; पांडित्य नाही. ते जीवनात आदर्श म्हणून अनुभवण्यासाठी आहे, जशी भगवदगीता.

माझ्या लहानपणी ( १९३२ - १९४० माझी आयुष्याची पहिली आठ वर्षें ) , मी आणि माझा लहान भाऊ सुरेंद्र बस्तर राज्यात जगदलपूर ला राहिलो. आमचे वडील जगदलपूरच्या Grigson High School चे Principal होते. ह्या शाळेच्या ५ एकर पसरलेल्या आवारात आमचे घर, शाळेच्या ५ इमारती, आणि दोन फुटबॉल ची पटांगणें होती. आमच्या घराच्या बाजूलाच ५० विद्यार्थ्यां करिता एक हॉस्टेल होते. हे बाहेर गावाहून शिकण्यास आलेले विद्यर्थी. प्रत्येक गुरुवारी हे विद्यार्थी एका खोलीत एकत्र होऊन यथायोग्य रामायण पूजा-पाठ करायचे. मी आणि सुरेन्द् ह्या पुजेस हौसेनी हजर रहायचे. पुजा आणि आरती नंतर गोडं गॉड प्रसाद मिळायचा . आम्ही तेव्हा ५ ते ८ वर्षाचे होतो. ह्या गोड अनुभवामुळे आम्हाला राम आणि रामायण पुरणाची आवड लागली होती.

आयुष्याच्या आठ दशकांनंतर
, आज रामायणाच्या संधर्भात हा लघु निबंध लिहिण्यास घेतला आहे.

संक्षिप्त स्वरूपात, राम हा शब्द दोन्ही रामायणाच्या पूर्वी पासून प्रचलित असावा. मुळात “राम” ध्वनितरंगात वैश्विक तत्वस्वरूप पूर्णतः समावले आहे जे सदा आपल्यात रमण करीत असते . ही  मान्यता आमची आई आणि आजोबा (भैया ) ह्यांच्या दैनंदिन जीवन शैली वरून आणि त्यांच्या सत्संग द्वारे उमजली भासते आहे. सोप्या भाषेत, सत्संग म्हणजे सद्विचारांची संगत. समजणे आणि उमजणे ह्यात अनुभविक भेद आहे.

आमच्या आजोबांनी ( भैया, आईचे वडील ) त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी एकच मंत्र सतत उच्चारला :
“ हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे  
हरे कृष्णा, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे “

हाच मंत्र त्यांच्या मनी आणि तोंडी , सतत २० वर्षा पासून आम्ही ऐकिला होता.

शेवटच्या दिवशी, हा मंत्र उच्चारता उच्चारता त्यांचे तोंड सुकून गेले म्हणून त्यांनी हाच मंत्र त्यांच्या नातवाकडून ( सत्चिदानंद ) म्हणवून ऐकिला … शेवटचा श्वास आंत घेई पर्यंत . शांत चित्ताने ते शेवटी सत्चिदानंदास प्राप्त झाले .
ही श्रद्धेची अगाध महिमा प्रत्यक्ष सगळ्या उपस्थित मंडळीस अनुभवण्यास मिळाली .
मरावे, परि शांती रूपी उरावे .
भैया, हेच माझे परमप्रिय सद्गुरू .
त्यांनी केवळ त्यांच्या आचरणाद्वारे, आम्हास वैश्विक तत्वे दर्शविली.

भैया आणि मोठी आई च्या उपस्थिती मुळेच आम्हां पाच भावंडांना १९४० साली श्र रमणमहर्षी चे साक्षात तिरूवन्नमलाई आश्रमात दर्शन मिळाले. तेव्हा रमण महर्षी मौन व्रतात होते, पण त्यांच्या वात्सल्यरुपी नजरेत,एक गुह्य अध्यात्मिक आदेश मिळाला. भैया श्री रमण महर्षी चे शिष्य होते ( Ref. Book titled Seamless Generations / अखंड परंपरा,  by Suresh M. Deo ).  


No comments:

Post a Comment

Flying Elephant and Dancing Donkey

Flying Elephant and Dancing Donkey When you see them both performing their arts  in the same arena, it is time to shut up and watch....