अहंकारी वासना, जन्मोजन्मीची पुनरपि सुनामी ( Tsunami )।
प्रत्येक मनोरथावर, अहंकारी रावण आरूढ असतो।
ब्राह्मणाच्या घरी जन्मून, हक्काने कोणी ब्राह्मण बनत नाही।
शूद्रांच्या घरी जन्मून, कोणी आपोआप शूद्र बनत नाही।
भूगर्भ आणि मातेच्या गर्भात, जातपात कदापि नाही।
ऐकीवात आहे कि लंकाधीश रावण, जन्मतः आणि जात्या ब्राह्मण,
यथा-योग्य वेद-शास्त्र संपन्न, आणि श्री शिवशन्कराच्या वरदानास प्राप्त झालेला,
पण अहंकार आणि वासना बाळगून, स्वतःच्या नाशास प्राप्त झाला।
समाजात असे रावण-ब्राह्मण अनेक आढळतात, ज्यांच्या आदरार्थ “ रावणमार “ नावाचा सण, भारतात दसऱ्याच्या वेळी साजरा होतो।
ब्राह्मण अथवा ब्राह्मणत्व, पांडित्याचे पारितोषिक नव्हे।
Defining any concept including Brahman limits it with our ignorance.
ब्राह्मणसह कोणत्याही संकल्पना परिभाषित करणे हे मर्यादित ठरते।
एका दृष्टिकोणातून, ब्राह्मण होणे किंवा बनणे म्हणजे जनसेवेचे एक अमूल्य साधन आणि जवाबदारी भासते ।
इच्छुकांना ज्ञानाचे दान अर्पण करण्याची अनमोल संधी।
अनासक्त भावाने ज्ञानाचे दान म्हणजे जीवनाची अमूल्य साक्षरता,
स्वतःच्या माणुसकीची अनुभविक ओळख-पारख ।
वैश्विक अनुभूतीस प्राप्त झालेला ब्राह्मण, ब्रह्मवेता आणि तिन्ही लोकीचा दृष्टा;
तो एकचि नारद, कदापि भ्रष्ट होणें असम्भव।
अशिक्षित लोक देखील, साधे-सोज्वळ आणि निर्मळ भावात सर्वोच्य आत्मज्ञान आणि आत्मबोधास प्राप्त होतात।
लंकाधीश रावण, अहंकार आरूढ वासना मुळे भ्रष्ट झाला,
आणि स्वतःच्या नाशास प्राप्त झाला होता। तरी स्वतःच्याच ब्राह्मणत्वामुळे अथवा सूक्ष्म सौन्स्कारामुळे, त्याने स्वतःचे मरण रामाच्या हाती इच्छिले होते, त्यास तो अंतीम समई प्राप्त झाला।
लन्कादहंन युद्धात, श्री रामने रावणाच्या बेंबीवर अचूक नेम घेऊन बाण सोडला,
ज्याने मुळातून रावणाच्या राक्षसी, अहंकारी वासनांचा वध झाला, आणि रावण स्वयंसिद्ध गतीस प्राप्त झाला।
छायाचित्र - रामायण रचणारे ऋषी वाल्मिकी
मनाच्या बाल्य सृष्टीत आणि दृष्टीत, रामायण कथन एक बहुमूल्य मार्मिक ग्रन्थ ठसतो, जशी इसाप नीती रचली आहे।
पण अक्कल-दुक्कल स्वयंसिद्ध, दृष्टा झाल्या नंतर :
राम म्हणजे जीवनाचे मूल ऊर्जा तत्व, जे सदा ध्यानी-मनी रमण करते ते।
रामायण-उत्तरार्ध ही रामचरित्र स्तुती, आणि दक्षिणार्ध सीताचरित्र स्तुती स्तोत्र।
रामायण वाल्मिकी ऋषीने, भारतवर्षाच्या संस्कृतीवर आधारून रचलेले मार्मिक वाङ्मय आहे। त्याच्या प्रत्येक स्तोत्रात जागृतिक खोल अर्थ आहे तो उमजणे महत्वाचे ठरते ।
छायाचित्र - श्री राम, सीता, लक्ष्मण आणि सेवाधर्म मारुती, पूष्पक विमानातून अयोध्येस परतण्यास निघालेले
रामायणाची केवळ पिढीजात अंधश्रद्धा म्हणजे स्वतःचे अज्ञान रूप धारणे, ज्याच्या साहाय्याने: वानरसेनेस महासागर ओलांडण्यास सेतू बांधला जातो, मारुती रायाचे Drone बनून लन्का नगरी पेटवून, लन्का दहन करणे शक्य होते, आणि राक्षसी रावण सत्तेवर विजय प्राप्त करून, पुष्पक विमानाने राम-सीता- लक्ष्मण- मारुती ह्या चवकडीस अयोध्या नगरीस परत जाणे संभव होते।
ब्राह्मण म्हणजे बुद्धिमत्तेची स्पर्धा किंवा अंकगणित नाही।
ब्राह्मण एक अमर्यादित आचार-विचारसरणी आहे ज्याला कोणत्याही वौन्श परंपरेची अथवा धर्म परिवर्तनाची गरज नाही।
ह्या मायारूपी निरंतर बदलणाऱ्या जगात, स्वतःची समतोल दृष्टीने ओळख करून घेणें आणि कधी न बदलणाऱ्या सत्याच्या अनुभूतीस प्राप्त होणे, हेचि आध्यात्म भासते।
हीच जीवनाची खरी साक्षरता ठरते … अक्कल-दुक्कल आणि त्यापलीकडे केवळ दृष्टा.
इति श्री ब्राह्मण पुराण, समाप्त !
No comments:
Post a Comment