धर्म आणि योगसाधना म्हणजे स्वतःला जीवनाच्या योग्य मार्गावर वळण देण्याची शिस्त।
योग्य मार्ग म्हणजे जीवनाचे अंतिम सत्य ( जे कधीही बदलत नाही आणि निरंतर आहे ) स्वतःच्या अंतर्यामी अनुभवा द्वारे जाणून घेणे, अथवा उमजणे। तोच साधक सद्गुरू अथवा परब्रह्म ऋषी।
परमात्मा म्हणजे स्वतःचे अंतिम सत्य स्वरूप, जे कधीही शोधावे लागत नाही, कारण आपण सदासर्वदा एकमेकात भिनलेले होतो, आहोत, आणि राहू; हेचि अध्यात्म।
जीवनाचा मूळ मंत्र आहे अक्षरा, ॐ चा ध्वनी तरंग देखील नाही; केवळ एकमेव अवर्णनीय अनुभूती आहे। ह्या सृष्टिकोणातून, मंत्र हे कोणतेही क्रिया-कर्म नाही, पूजा-पठण नाही, पांडित्य प्रदर्शन नाही; केवळ अनुभवण्यासाठी “आत्मनिवेदन” आहे; शांतचित्तात स्वगत, मनोगत एकमेव अवर्णनीय अनुभूती आहे।
तोचि साधक, त्रिभुवनदास पदास प्राप्त होतो।
ताजा कलम: माझा मित्र, श्री शास्त्री @ Oakville, Ontario, Canada ह्यानी माझ्या लघु निबंधास फुलदाणीत मांडून त्याची शोभा वाढवली, त्याबद्दल त्याचे आभार मानतो .
सुरेश ,
तुझी परवानगी न मागता
केले मी खालील धाडसा
क्षमा करा या पाडसा
श्री
धर्म आणि योगसाधना
सुरेश देव
धर्म आणि योगसाधना देती जीवन वळणा शिस्त
योग्य मार्गा वसते अंतिम सत्य
जे केव्हाही न बदले परी राहे निरंतर
स्वतःच्या अंतर्यामी अनुभवी द्वारे
जाणाल तोची असे सदगुरु परब्रम्ह
स्वतःचे अंतिम सत्य स्वरूप म्हणजे परमात्मा
लक्षात असुदे मंत्र नसे कोणतेही क्रिया कर्म
नच असे पूजा-पठण अथवा पांडित्य प्रदर्शन
मंत्र साधनेतुनी अनुभवा “आत्मनिवेदन”
शांतचित्ति स्वगत ,मनोगत एकमेव अनुभूती
घडवी साधका त्रिभुवन पद प्राप्ती
No comments:
Post a Comment