०७ जून, २०१७
श्री - काही वर्षांपूर्वी मी तुला विचारले होते कि खालील दोन शब्द संस्कृत मध्ये कसे लिहितात आणि तू प्रत्युत्तरात लिहून पाठवले होते “ प्राणायस्वा: / अप्राणायास्वाः “.
आज त्या दोन शब्दावर रचलेला निबंध, माझा आत्मसौंवाद, तुला पाठवीत आहे.
सुरेश
मंत्र आणि जीवनाची मूळ साक्षररता
-------------------------------------------
प्राणायस्वा: / अप्राणायास्वाः
मंत्र हे कोणतेही क्रिया-कर्म नाही, पूजा-पठण नाही, पांडित्य प्रदर्शन नाही; केवळ अनुभवण्यासाठी आत्मवन्दन आहे, शांतचित्तात स्वगत, मनोगत एकमेव अवर्णनीय अनुभूती आहे.
श्वासोश्वास अथवा प्राणायस्वा: / अप्राणायास्वाः ही शारीरिक अस्तित्वाची निरंतर गती आहे, जी आपोआप चालू असते, ज्यात आपली वैयक्तिक भागीदारी केवळ आपले शरीर आणि स्वतःचा अहंकार. आपले शरीर देखील आपल्या मालकीचे नाही, कारण ते देखील आपोआप रचलेली नैसर्गिक कलाकृती आहे. एक अंडे मातेच्या गर्भकोशात फलित होते जे मानवी शरीराची रचना करण्यासाठी कारणीभूत होते. ही सर्व कलाकृती केवळ नैसर्गिक असते. ह्या सर्व क्रियेत आपली स्वतःची भागेदारी शून्य; ह्याची जाणीव ठेवणे अथवा होणे, हीच आध्यात्माची सर्वप्रथम पायरी भासते.
प्रत्येक धार्मिक पूजा कार्यप्रक्रियेसाठी आमच्या धंतोलीच्या निवासस्थानी येणाऱ्या गुरुजींचे आडनाव पुराणिक. माझ्या आठवणीत, ह्या गुरुजींनी प्रत्येक पुजेची सुरवात आणि समाप्ती एकमेव मंत्राने केली “ प्राणायस्वा: / अप्राणायास्वाः “. हाच जीवनाचा मूलमंत्र भासला आणि हळू हळू मनात दृढ झाला आहे.
श्वास शरीरात येणे, आणि त्यानंतर शरीराच्या बाहेर जाणे ह्या दोन आपोआप होणाऱ्या अवस्थेत, संपूर्ण जीवन अस्तित्व समावलेले भासते; ज्यात आपल्या स्वाभिमानाची भागेदारी शून्य आहे.
आज हा लघु लेख लिहिताना, आमच्या आजवळी पुजेस येणाऱ्या पुराणिक गुरुजी घराण्याची आणि त्यांच्या अखंड परंपरेची तीव्र आठवण होत आहे. आमची मोठीआई आणि आजोबा ( भैया ) हयात असे पर्यंत मोठे गुरुजी पूजेस यायचे. त्यांच्या हयातीत आणि पाश्चात्य मी जेव्हा पुजेस बसलो, तेव्हा मोठ्या गुरुजींचे चिरंजीव शंकर, मधू आणि वसंत वयोमानाप्रमाणे पाठोपाठ येत राहिले. आता त्यांची तिसरी पिढी आमच्या नातेवाईकांच्या पूजेच्या दिगदर्शनास आढळत आहे. ही आत्मबौद्धिक परंपरा बदलत्या काळात देखील चालू राहो हीच गुरुजींच्या घराण्याबद्दल सदिच्छा. जो गुरुप्रसाद आणि त्याचा बौद्धिक स्वाद आम्हाला बालपणापासून लाभला, तोच येत्या पिढयांना यथायोग्य रूपात मिळत राहो.
आमचे आजोबा, भैय्यांनी सहज प्राणायाम कसा आणि कां करावा ह्याचे तपशीलवार वर्णन त्यांच्या हस्तलिखित वहीत केले आहे. त्या लिखाणात देखील “ प्राणायस्वा: / अप्राणायास्वाः “ ह्या विषयाचा अभ्यास दीर्घ आणि खोल श्वासोश्वासाद्वारे कसा करावा ह्याचे स्वानुभाविक मार्गदर्शन केले आहे.
अनासक्त भावात, कोणतीही अपेक्षा न ठेवता, केलेल्या सहज प्राणायाम द्वारे, आपण आत्मबोधास प्राप्त होतो. तोचि अवर्णनीय दृष्टांत. ह्या विषयाचा अर्थपूर्ण खुलासा भैयांनी “Seamless Generations / अखंड परमपरा“ पुस्तकात केला आहे. ते पुस्तक भैयांच्या आणि त्याची एकुलती एक लेक, आमच्या आईच्या श्रद्धांजलीस अर्पित आहे.
जीवनाची मूळ साक्षरता आत्मज्ञनात, जी सूक्ष्म रूपाने सौन्स्कारा द्वारे प्रत्येकास लाभत असते; त्यात अहंकाराला कोणतीही भागेदारी नाही. त्याच द्वारे, आत्मबोध एक अवर्णनीय अनुभूती आहे, ज्याला प्रत्येक साधक सरते शेवटी “दृष्टा” बनून प्राप्त होतो. हाच दृष्टांत. हे बोल केवळ अखंड ज्ञानपरंपरेतून निथळून निघालेले भासतात.
एका अर्थी तपश्चर्या म्हणजे, अनासक्त भावात जुडलेली एकाग्रता, अथवा योगसाधना भासते; ज्यात काळ, काम, वेग आणि अहंकाराचे अस्तित्व नाही.
“ प्राणायस्वा: / अप्राणायास्वाः “ केवळ एक मूळ मंत्र
No comments:
Post a Comment