FOUR CASTES -
चार वर्ण अथवा चातुर्वर्ण
---------------------------
भाषा एक बोलण्याचे साधन आहे. त्याचा जेव्हडा उपयोग तेव्हडाच दुरुपयोग देखील होण्याचा संभव असतो.
आधुनिक भारतीय समाजात, चातुर्वर्णाला जातीच्या रूपात अंगीकारून समाजास खंडित केले आहे असे तीव्रतेने भासते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र नावा खाली, पुरुष अर्थाचे खंडन झाले आहे आणि माणुसकी दुरावली आहे.
अज्ञान, ज्ञान, आत्मज्ञान आणि आत्मबोध ह्या चार चढत्या पायऱ्या नाहीत. स्वतःच्या मनःस्थितिचे हे चार सदा बदलणारे रंग आणि रूपें आहेत. प्रत्येक मानवी रूपात आणि जीवात, अखंड आत्मस्वरूप सदा सूक्षम रूपाने वसलेले आहे… इकडे, तिकडे, चहूकडे सार्या अनंत ब्रह्माण्डात,
भाषा आणि मौन स्थिती, ह्या दोन वेग वेगळ्या भाषा आहेत.
भाषा, गुरु रूपे, मानवास मार्ग दर्शन देते.
मौनस्थिती, सद्गुरू रूपे, मानवास आत्मबोधास प्राप्त करते.
आत्मबोध हे स्वतःच्या अंतर्यामी अनुभवावर आधारलेले आणि उभारलेले आत्मस्वरूपी अखंड ज्ञान …
जे आपणास दिसते ते रूप. आणि जे दिसत नाही ते स्वरूप.
No comments:
Post a Comment