Thursday, June 13, 2013

१३ जून, २०१३   

लेखणीचे मर्यादित सामर्थ्य -

आमच्या लहानपाणी आईनी भारतीय ऋषी परंपरेतल्या शिक्षण पद्धतीची आणि शिस्तीची प्रथा आणि त्यातला आपल्या बौद्धिक पातळीचा विकास करण्याचा उद्देश समजवून दिला. ऋषी परंपरेत वयोमाना प्रमाणे ज्ञ्यान ग्रहण करण्याच्या चार (४) चढत्या पातळ्या होत्या.  
१. श्रवण (Listening).
२. अध्ययन (Learning) .
३. चिंतन (Internalized self-knowledge) .
४. मनन (Revisiting your own thoughts and life experiences, which is not the traditional Meditation ) .

वर दिलेल्या बौद्धिक अथवा ज्ञानपातळ्या प्रथम असाध्य (Not achievable), नंतर सुसाध्य (Not easily possible either} आणि शेवटी कष्टसाध्य (Possible after innumerable deliberations) होतात.
अ, आ, इ, ई , उ,ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:  हे केवळ आवाज आहेत ज्यांना सौन्स्कृत लिपीत रूप दिले आहे. ह्याच पद्धतीने एकंदर ५२ वेगवेगळ्या आवाजांना सौन्स्कृत भाषेच्या लीपित सुंदर रूप दिले आहे. पुढे जाउन मानवानी आवाजच्या समूहाला अर्थ दिला; उदाहरणार्थ पशू, पक्षी, आई, बाबा, गुरू, स्वर्ग, देव इत्यदि. अश्या प्रकारे प्रथम शब्द आणी नंतर व्याकरण आणी भाषा प्रचलीत झाली असणार.

कोणताही शब्द बोलणे, ऐकणे, समजणे आणि उमजणे ह्या ज्ञान ग्रहण करण्याच्या चार (४) पातळया आहेत. प्रत्येक शब्दाचा अनुभव झाल्या शिवाय शब्दाचा अर्थ लागत नाही. त्यामुळे, आई ह्या शब्दाचा अर्थ आयुष्यात सगळ्यात पहिले सहज उमजतो आणि देव अथवा देवतत्वाचा अर्थ सर्व शेवटी आणि कधी पूर्ण जन्माचा प्रवास झाल्यानंतर देखील उमजत नाही.…. कधी कधी सहस्त्र पुनर्जन्मा नंतर देखील देवतत्व उमजत नाही, हा कर्म बंधनाचा खेळ असावा. देवतत्व उमजण्यास कितीही वेळ अथवा काळ लागला तरी मानवास खर्या बौद्धिक अथवा मुक्तिरूप मनोस्वातंत्र्याची ओढ सदा लागलेली असते. हे कोणत्याही लेखणीतून निघालेले पांडित्य नसून, ऋषी परंपरेतून आलेले आत्मज्ञान भासते.   

एक वर्षाचे बाळ जेव्हां हळू हळू आईशी बोलायचा प्रयत्न करतो त्यावरून भाषा कशी निर्माण होते त्याचा थोडा अंदाज येतो. बालकाला बोलवण्यास त्याची आई म्हणते “इकडे ये””. त्या वयात बालकास आई व्याकरण शिकवत नसते. पण शब्दाबरोबर आईचे हातवारे पाहून बालकाला कळत कि आई काय म्हणते आहे आणि तो आई जवळ जातो. अश्याप्रकारे ऐकण्याची आणि आचरणाची कला साध्य होते.… हे सुंदर आणि सोपे उदाहरण सौ. अनुराधा फडणीस ह्यांनी दिले.

प्रत्येक शब्दाला अर्थ दिला जातो किंवा विषयाला शब्द दिला जातो हे प्रत्येक भाशेत थोडे गूढ असावे. मराठी भाषेत देव आणी ब्राह्मण हे शब्द वेगवेगळ्या अर्थानी  वापरले जातात. आयुष्याच्या वैयक्तिक अनुभवा प्रमाणे शब्दात रंग भरला  जातो.

देव हा शब्द मानवाचा बर्याच आवडीचा आणी परिचयाचा दिसतो. पण ह्या शब्दाच्या कुंभात बरेच वेगवेगळे अर्थ समावलेले आढळतात. देव शब्द अन्ना प्रमाणे ग्रहण करून नुसता गिळून टाकला तर त्याला एक अर्थ लागतो. तोच शब्द अन्नसार्खा ग्रहण करून,  ३२ वेळा चावला तर तो जास्त पचून त्याला वेगळी चव आणि अर्थ लाग्तो. चिंतन करताना त्याच शब्दाचे चर्वण होते ज्याने मानव बुद्धीचा हळूहळू विकास होतो आणि मानवबुद्धी पलीकडचा गुह्य अनुभव होण्याची शक्यता वाढते.

तसाच ब्राह्मण हा शब्द प्रयोग बर्याच वेग वेगळ्या प्रकारे वापरला जातो. आपण आपले वैयक्तिक स्वातंत्र्य वापरून खाली विचार मांडू .

मी ब्राह्मण आहे म्हणजे कोण ? ब्राह्मणाच्या घरात जन्म होवून, ब्राह्मण बनत नाही. ब्राह्मण बनावे लागते. ब्राह्मण एक जात आहे हा अहंकारी अथवा भ्रमिष्ट मानवाचा मोठ्ठा गैरसमज झालेला दिसतो .  निसर्ग रूपी ब्ब्रह्मांडाचे अनुभविक ज्ञान उमजण्यास योग साधना करणारा मानव, ब्राह्मण. ब्राह्मणाच्या दैनंदिन  जीवन शैलीत सात्विक आचार, विचार आणी उच्चार करण्याची समतोल बुद्धी,  वृत्ती आणी क्षमता असते.

ज्या ब्राह्मणाच्या तोंडी खालचे-लोक ,शूद्र, परकेलोक असे शब्द रोजच्या वापरीत असतात त्यांचे आचार आणि विचार पण त्याच धारणेत असतात .…. तो ब्राह्मण नव्हे. ब्राह्मणाच्या वौंशात जन्म होवून शूद्रा सारखे वागणारे बरेच भेटतात. मग शूद्र कोण हे कुणी ठरवायचे ? हा हक्क कोणालाही नाही.

मराठी ब्राह्मण  घराण्यात जन्म होण्याचे फायदे बरेच असा माझा समज होता, पण तो हक्क नव्हता. लहान पणी माझी स्वतःची ओळख म्हणजे मी प्रथम ब्राह्मण आणि त्यानंतर महाराष्ट्रीयन (महाराष्ट्र प्रांतवासी) आणि शेवटी हिंदुस्थानी कारण त्या वयात अजून देश, मानव-समाज आणि जगाचा अंदाज आलेला नव्ह्ता. बालपणात मन जेवढे नैसर्गिकपणे मोकळे असते तेव्हडेच सामाजिकपणे बांधलेले भासते.

ब्राह्मण वस्तीत राहून “दुसर्या” आणि “खालच्या” लोकांशी घनिष्ट संबंध कमी येतो, आणि हे दोन शब्द आमच्या लहान पणी समाजात ऐकले. दुसरे लोक म्हणजे दुसरी मातृभाषा बोलणारे आणि परजातीचे लोक; त्यात  सगळे शूद्र, वैश्य, क्षत्रीय, वेगळी भाषा बोलणारे, वेगळ्या धर्माचे, वेगळ्या प्रांताचे, वेगळ्या देशांचे. खालचे लोक हे विशेषण वैयक्तिक दृष्टीने वेग वेगळ्या संदर्भात वापरले जात होते . लोकांची स्वछतेची कल्पना म्हणजे घरातला केर काढून तो शेजार्यांच्या आवारात टाकून देणे. आपला देव समुह आपल्या देवघरात सदा स्वछ असावा.

ब्राह्मण आणी ब्राह्मणेतर वाद, सावोच्य मराठी भाषा आणि इतर भाषा ह्या परमप्रिय वादात तासनतास कशे सहज निघून जातात. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य, शुद्र आणि माणुसकी ह्या शब्दांच्या गूढ अर्थाचा आणि आचरणाचा अभाव भासतो. हीच दुर्बलता  आपल्या  सार्वजनिक भारतीय समाजात देखील आढळते. ह्याच दुर्बलतेमुळे भारताच्या बाहेरून आलेल्या आक्रमणकारी लोकांना शूद्र वर्गाला धर्म परिवर्तन करण्यास सोपे झाले. .  ब्रिटीश साम्राज्या कडून स्वातंत्र्य मिळवत्या वेळी (१९४६ - ४७ )  हिंदू-मुसलमान भांडणात अखंड हिंद्स्थानची फाळणी पत्करली.  त्यानंतर स्वतंत्र भारताला वेग वेगळ्या भाषेच्या भांडणावरून समजाची दुसरी फाळणी झाली . आता प्रत्येक प्रांतात ब्राह्मण आणी ब्राह्म्हनेतर हा विवाद सतत चालू असतो. अजूनही एकविसाव्या शतकात देखील जाती भेदाच्या ज्वाला समाजानी पेटत ठेवण्याचा हट्ट धरलेला आहे जो खर्या मनो स्वातंत्र्याला आणि विवेक बुद्धीला शृंखलात अडकवून ठेवतो. आर्थिक प्रगती आणि मानव विकास प्रगती देशाला वेग वेगळ्या दिशेत नेते आहे.

भारतातून निघून पास्चीमात्य देशात स्थाईक  झालेले भारतीय लोकपण त्याच मनो ढाच्यात रहात असतात. हे सगळे पाहून, ऋषी परंपरेची अलौकिक सौन्स्कृती झोपी गेल्याचा भास होतो. अश्या सर्व गोष्टीनचा खेद करत बसण्या ऐवजी स्वतःला सुसौन्कृत करून सचिदानंद स्वरूप अनुभवणे हा सर्वोच्य संकल्प भासतो. साचीदानंद स्वरूप आपोआप आजू बाजूच्या देश बांधवांना प्रज्वलित करते.

शेवटी ब्राह्मण म्हणजे कोण ? जो जीव
स्वतःला मानव म्हणून ओळखतो,
स्वतःच्या माणुसकीला जपून ठेवतो,
सर्व जीवांना समदृष्टीने पाहण्याची क्षमता ठेवतो,
आचार, विचार आणी उच्चार सात्विक पणे बाळगतो,
सर्वव्यापी ब्रह्मांडाशी स्वतःला जुडलेला अनुभवतो,
तो ब्राह्मण होय.  

शिक्षणाची परंपरा असते. मी आणी माझा लहान भाऊ, सुरेंद्र, चौथी पर्यंत प्राथमिक शाळेत गेलोच नाही कारण आमची आई आम्हा दोघांना घरीच शिकवायची. बस्तर राज्यात जगदलपूर मध्ये एकच प्राथमिक शाळा होती (१९३२ - १९४० ) पण ती नसल्या सारखीच होती. त्याच प्रमाणे, आमच्या आइच्या लहान पणी सुद्धा (१९०९-१९१७ ) , ज्या ज्या शहरात आजोबांची बदली झाली तिथे लहान मुलीन करता शाळा नव्हती. सरकारी  डॉक्टर च्या पेशात आजोबांची बदली उज्जैन, दामोह, खुरई, चीन्द्वाडा, हुशांगाबाद इत्यादी लहान शहरात होत असे. त्यामुळे आजोबांनी आमच्या आईला घरीच शिकवून सुशिक्षित केले होते. त्याच आधारावर आईने, सोळाव्या (१६) वर्षी लग्नानंतर,  पाच  मुले झाल्यानंतर बी . ए. आणि होमिओपथिची डिग्री संपादन केली; आणि त्यानंतर पुढच्या संपूर्ण आयुष्यात गरजू लोकांना फुकट होमिओपथीची औषधे देण्याची योगसाधना केली. ह्या स्वरूपात तिनी तिच्या आई वडलांना श्रद्धांजली अर्पण केली असे मला भासते. .

आमच्या लहानपणी वयोमानाप्रमाणे आम्ही घरीच वाचणे, पहाडे पाठ करणे, लिहिणे शिकलो. तेच आमचे गुरुकुल होते. बालपणी पाठांतर करण्य्याची उर्जा तीव्र असते त्यात प्रोत्साहन मिळून बरेच पाठांतर करता येते. हे पाठांतर जन्मभर सहज टिकून रहाते. ह्या पूर्वतयारीत पाठ केलेल्या शब्दांचे अर्थ सहसा लागत नाही आणि अर्थ कळला नाहीत तरी चालते.  त्यानंतर लिखाणाला सुरवात होते. शब्द लिहून काढताना ते मनातून हातात बसतात, आणि हळू हळू शब्दांच्या अर्थाचा उलघडा होण्यास सुरवात होते. त्यानंतर वेगवेगळ्या गद्य, पद्याचे वाचन आणि मोकळ्या मनानी चर्चा सुरु झाली म्हणजे शब्द, श्लोक, गद्य, पद्य ह्या सर्वांचा उलघडा होऊ लागतो.

आश्रम अथवा गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या शिस्तीत समतोल आहार, व्यायाम, योगाभ्यास आणि पुरेसा आराम अश्या निरंतर वातावरणात शरीराचा तोल संभाळून मन एकन्द्रित करण्याची उर्जा वाढते. ह्या उर्जेत चिंतन करून आत्मबोध मार्गावर सफलता मिळण्याची शक्यता वाढते. चिंतन आणि मनन मार्गे मानवास स्वतःचा निसर्गाशी जो निकट संबंध आहे त्याची अनुभूती होत जाते. अश्या आत्मज्ञानी मानवास देवतत्व शोधण्यास अथवा त्याची अनुभूती होण्यास कुठेही बाहेरच्या जगात किवा वनात भटकावे लागत नाही. एक जुनी म्हण आठवते “जो जिथे आहे तिथेच ठीक आहे”.

लेखणीतून शब्द उतरतात पण त्या शब्दांचा अनुभव लेखकास किंवा वाचकास झाला नसेल तर ते शब्द अर्थहीन किंवा अपभ्रौंश स्थितीत रिकामेच राह्तात. हाच फरक गीता किंवा कोणताही ग्रंथ वाचण्यात, समजण्यात आणि उमजण्यात भासतो. आमच्या स्नेही सुप्रसिद्ध लेखिका सुलभा  हेर्लेकर (१९४१ - २०१२) ह्यांनी आत्मबोध शब्दाला सोप्या मराठीत गुंडाळून सांगितले “ आत्मबोध म्हणजे स्वतःच्या अनुभवावर आधारलेले आणी उभारलेले ज्ञान “.
   
अनुभवा अंतीच उमजणे साधते. ह्या कारणामुळे,  प्रयत्ना अंती  परमेश्वर म्हणायच्या ऐवजी, अनुभव आणी उमजण्या अंती परमेश्वरतत्व साधणे जास्त अर्थाचे.

धार्मिक आणी तत्त्वज्ञान वांग्मय क्षेत्रात  कोणत्याही शब्दाचा अर्थ अथवा उलघडा चार (४) वाढत्या बौद्धिक पातळीतून होत असतो;  स्थूल, सूक्ष्म, शून्य आणी शिव. शिव म्हणजे कॅलेंडरवर छापलेल्या माणसाचे चित्र नव्हे. एका अर्थानी शिव म्हणजे “ जे नाही ते “. शब्द आपल्या वैयक्तिक मनाचे प्रतिबिंब भासते.

स्थूल स्वरूपात आपण शब्दांना पोथी आणि पुराणात वाचतो आणी प्रवचनात ऐकतो.
सूक्ष्म स्वरूपात आपण शब्दाला अनुभवण्याचा चिकाटीने प्रयत्न करीत असतो.
शून्य स्वरूपात आपण अनंत (infinity) स्थितीला आत्मसाथ करण्यास आव्हान देतो. सोप्या भाषेत, आपण नैसर्गिक मानव स्थितीत फोहोचतो अथवा उतरतो.
शिव स्वरूपात आपण स्व्त्तःच  शब्द बनतो.

प्रत्येक लेखकाचा तत्वज्ञान विषयी लिखाणातून आत्मबोधाच्या बदलत्या पातळया अनुभवण्याचा निरंतर प्रयंत्न चालू असतो. पण हया मार्गावर प्रगती होत असताना  लेखणीला लक्षमण रेषेची अनुभूती होते. ह्या लक्ष्मणरेषे पलीकडे शब्द, लिपी, पोथी, पुरण, आणी लेखणी ह्या सर्वांचा लय होतो. त्या पलीकडचा प्रवास आत्मचिंतन आणि मनन मार्गानेच होतो हा आदेश आपल्या ऋषी परम्परेतून निताळून आलेला भासतो. लेखकाला लेखनक्रिया त्या लक्ष्मण रेशे पर्यंत पोहण्याची एकप्रकारची योग साधना भासते. चिंतनात्मक योग मार्गे एक वैयक्तिक  “गुह्य” अनुभव होतो ज्याला कोणत्याही शब्दांनी वर्णन करता येत नाही. हा गुह्य आणि वैयाक्तिक अनुभव त्याची आकांक्षा किंवा इच्छा न ठेवताच प्राप्त होतो.…. हा देखील ऋषीपरंपरेचा सेवोच्य गुह्य आदेश भासतो. भारतीय संस्कृतीत ह्या वैयक्तिक अनुभवास वेगवेगळ्या शब्दांनी संबोधिले जाते, उदाहरणार्थ अमृत-अनुभव, सत्चीदानंदा, चिदानंद, ओम, निर्वाण, मुक्ती, महासमाधी इत्यादी … …असा माझा तर्क आहे. ह्या गुह्य अनुभूती नंतर त्या पुरषोत्तमरूपी योगीपुरुषास स्वतःचे मानव शरीर त्याग करण्याची पूर्ण तयारी आणी आतुरता भासते. ह्या विचार आणि योग धारणेत संत ज्ञानेश्वर, ज्यांनी अमृत-अनुभव आणि ज्ञानेश्वरी लिहून, वयाच्या एकविसाव्या (२१) वर्षीच समाधी घेतली (ई १२ १८ ) हे उदाहरण डोळ्या समोर उभे रहाते. भारत वर्षाच्या ऋषी परंपरेत अशी उत्कृष्ट उदाहरणे बरीच आढळतात म्हणून मी भारताला “आत्मबोधाचा पैलू अथवा मोती” म्हणून सम्बोधितो. ह्या पैलूला सांभाळून ठेवण्याची जवाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.

आजकालच्या असंतुलित जगातपण आत्मबोधाचे पुरषोत्तम पैलू सापडतील, पण बर्याच प्रयत्ना अंती. … कारण देवतत्व सदा आणी सर्व विश्वात निरंतर सामावलेले असते; आणि त्याचा कधीही अभाव होणे असंभव आहे.

स्वतः पुशोत्तम बनणे आणि देवतत्व अनुभवणे सर्वात महत्वाचे. पुरषोत्तम म्हणजे स्वतःचे शरीर आणि आत्मा ह्या मधला फरक समजून, त्या पलीकडे आत्मा आणी परमात्माचे अद्वैत स्वरूप अनुभवणे.

“अखंड परंपरा /  Seamless Generations” पुस्तकाची नवीन आवृती (२०१३), वर दिलेल्या विचार धारणेवर आधारलेली आहे. हे पुस्तक आत्मबोधाचे चरित्र आहे ज्याच्यात एका वौन्शाच्या चार (४) पिढ्यानचे आत्मबोध  विशयावरचे लेखन प्रस्तुत केले आहे. ह्या चार पिढ्यातून दोन (२) पिढ्या अमेरिकेत वाढल्या आहेत; आणि त्यात माझी भूमिका सर्व लेख एकत्र करून तो संग्रह वाचका समोर प्रधान करण्याची आहे; आत्मबोधाची धारा कशी वहाते ह्याची थोडी कल्पना देण्याच्या दृष्टीने. ह्यात एकच आठवण ठेवावी लागते की प्रत्येक वौंशाची विचारधारा स्वाभाविकपणे वेगळी असते आणि त्यत गैर काहीच नाही. प्रत्येक मानव आकाशात चमकणार्या चांदणी प्रमाणे स्वतःच्या उजेडात चमकतो असा भास होतो . “अखंड परंपरा / Seamless Generations” ह्या पुसताकाची ई-बुक किंवा छापलेली आवृती उपलब्ध करण्यास खालील पत्ते वापरावे:
e-book - scribd.com,
Printed book (230 pages) - amazon.com









No comments:

Post a Comment

Flying Elephant and Dancing Donkey

Flying Elephant and Dancing Donkey When you see them both performing their arts  in the same arena, it is time to shut up and watch....